List Headline Image
Updated by TV9 Marahi on Jun 22, 2021
 REPORT
TV9 Marahi TV9 Marahi
Owner
38 items   3 followers   0 votes   20 views

Marathi News

Read the TV9 Marathi Breaking News, TV9 Marathi Live News and all latest news from India & World in Marathi on Politics, Business, Technology, Entertainment, Sports etc.

LIVE : विधानभवनात मराठी भाषा दिनाचा गौरव

LIVETV – भले मुलांना इंग्रजी शाळेत टाका, परंतु मुलांनी घरात मराठीच बोलली पाहिजे, मराठी संस्कृती जपली पाहिजे, मराठी सण उत्सव साजरे केले पाहिजे, कोणती भाषा ओठातून नव्हे पोटातून आली पाहिजे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा – अजित पवार https://t.co/kGHfDJfyJs @AjitPawarSpeaks pic.twitter.com/5EwSQph5ph

SRA योजनेतील फ्लॅटचे नियम शिथील करणार SRA Flats Rules to be change

'झोपु' म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन योजना किंवा 'एसआरए' कायद्यात मोठा बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. SRA Flats Rules to be change

सलमानकडून पूरग्रस्त गाव दत्तक Salman Khan Adopts Flood Affected Village

कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे. (Salman Khan Adopts Flood Affected Village)

मुंबईत सरकत्या जिन्यात अडकून दीड वर्षीय मुलाची बोटं तुटली

मुलुंडमध्ये एका मॉलमधील एस्कलेटरमध्ये (सरकते जिने) अडकून दीड वर्षीय मुलाच्या हाताची तीन बोटं (Escalator accident) तुटली आहे.

मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण Reservation to Muslims in educational institute

महाविकास आघाडी सरकार लवकरच मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहे Reservation to Muslims in educational institute

ओबीसी जनगणनेबाबात एकमत, महाराष्ट्र विधानसभेत कोण काय म्हणाले?

ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर आज महाराष्ट्राच्या विधानसभेत (Maharashtra OBC Census ) चर्चा झाली.सत्ताधारी- विरोधकांनी ओबीसी जनगणनेच्या बाजूने मत मांडलं.

शिवरायांच्या जयघोषावर हात वर करुन दाखवा, गिरकरांच्या मागणीला नवाब मलिकांचं उत्तर

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार भाई गिरकर विधीमंडळात उभे राहिले आणि त्यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला. Bhai Girkar Nawab Malik tussle

PHOTO : यवतमाळमध्ये वाघिणीचा चार बछड्यांसह गायीवर हल्ला

यवतमाळ जिल्ह्यात वाघिणीने एका गायीवर हल्ला (Tiger attack on cow) केला. टिपेश्वर अभयारण्याजवळ असलेल्या सुन्ना गावा परिसरामध्ये एका वाघिणीने तिच्या चार बच्चड्यांसह गायीवर हल्ला केला. हल्ला केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली (Tiger attack on cow) आहे.

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील कैद्यांच्याद्वारे मास्कची निर्मिती, गृहमंत्र्यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवा...

'कोरोना' विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात (Prisoners making mask in jail) वाढली आहे.

Corona Effect Weddings Postponed in Pimpari Nagpur Hingoli Nanded and all over Maharashtra | 'समीप आलेली लग्नघटिका' प...

'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात अनेक विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय वधूवरांनी घेतला आहे. Corona Effect Weddings Postponed

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईकरांचा काहीसा प्रतिसाद, रस्ते, लोकलमधील गर्दी तुलनेने कमी | Corona live Mumbai local...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळून गर्दी (Mumbai local train update) कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

Yes Bank to resume full banking services RBI had imposed moratorium on the bank & capped withdrawals | 'येस बँक' निर्...

'येस बँके'च्या खातेधारकांन संध्याकाळी सहा वाजल्यापासून संपूर्ण बँकिंग सेवा पुन्हा सुरु वापरता येणार आहे. Yes Bank resume banking

France Return Pune Woman Report Corona Positive | पुण्यात कोरोनाग्रस्त वाढले, 'फ्रान्स रिटर्न' महिलेला लागण

पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. France Return Pune Woman Corona

Crude oil price decreases hit lowest in 18 years congress demands to cut petrol diesel prices | कच्च्या तेलाच्या किमत...

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा गडगडल्याने तेलाच्या किमतीनी 18 वर्षांतील निच्चांक गाठला Crude oil price decreases

Corona Live : एक दिवसआड नव्हे, 100 टक्के बंद, दादरमधील व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय

दादर व्यापारी संघटनेचा स्तुत्य निर्णय, गर्दी टाळण्यासाठी दादरमध्ये 100% लॉकडाऊन करण्याचा व्यापारी संघटनेचा निर्णय, गुढीपाडव्यापर्यंत दादरमधील 1000 दुकानं पूर्णत: बंद राहणार, प्रशासनानं एक दिवसाआड दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र व्यापारी संघटनेनं स्वत:हून पुढाकार घेत 100% दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला. जी उत्तर वॉर्ड ऑफिसमध्ये पत्र देऊन व्यापारी संघटनेनं कळवला निर्णय.

Corona positive | महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर, आणखी दोन महिलांना लागण

महाराष्ट्रात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Mumbai corona positive) आढळले आहेत. मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

Corona Update APMC closed | आशियातील सर्वात मोठं मार्केट बंद, वाशी APMC मार्केटमध्ये खबरदारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणं बंद (APMC Market closed) करण्याचं आवाहन केलं जात आहे. एपीएमसी मार्केट आठवड्यातून दोन दिवस बंद.

Corona Effect On Vegetable Market APMC at Navi Mumbai | Corona | APMC मध्ये भाजी-पाल्याची आवक, मात्र उठावच नाही, कोबी...

भाजीपाला बाजारात शेतमालाच्या 900 गाड्या आल्या असून कोबी, फ्लावर या भाज्या 2 ते 5 रुपये किलो विकली जात आहेत | Corona Effect On Vegetable Market

महाराष्ट्रात सर्वात मोठा आशेचा किरण, 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर, रुग्णांची संख्या 52 वर | Maharashtra Health Mini...

कोरोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला मोठं (Maharashtra corona cases) यश मिळताना दिसत आहे. कारण 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर आहेत

Nirbhaya Convicts Last Wish, last night before hanging | निर्भया प्रकरण : कशी होती आरोपींची फाशीपूर्वीची रात्र?

फाशीच्या आदल्या रात्री चारही आरोपींपैकी फक्त मुकेश आणि विनयने रात्रीचं जेवण केलं. पवन आणि अक्षयने रात्रीचं जेवण केलं नाही. | Nirbhaya Convicts Last Wish

डिजिटल पेमेंट आता अधिक सुरक्षित, ऑनलाईन व्यवहारांना एटीएम पिन नाही

डिजिटल पेमेंट सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑनलाईन पेमेंटमध्ये महत्त्वाचा (digital payment rules change) बदल केला आहे.

Maharashtra Corona Patients Number increases by 15 in 24 hours Mumbai by 14 Pune by one | कोरोनाचा विळखा : 24 तासात क...

¬ई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे. (Maharashtra Corona Patients Number) कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या कालच्या दिवसातील 15 रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांचा प्रवास केलेला आहे. तर उर्वरित आठ जण हे आधीच कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. पुण्यात परदेशी प्रवास न केलेल्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क न आलेल्या 41 वर्षे महिलेला व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येऊन माहिती घेतली आहे या महिलेच्या संपर्कातील सहापैकी चार जणांना बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. चार व्यक्तींमध्ये महिलेच्या मुलाचाही समावेश आहे. त्याचबरोबर तिची बहीण, बहिणीचा पती आणि मुलीला बाधा झाली आहे. या सर्वांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पाचही जणांची परदेश प्रवास किंवा संबंधित प्रवाशांच्या संपर्काची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव सुरु झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 'जनता कर्फ्यू' आणि 'कोरोना'बाबत 10 विलक्षण गोष्टी https://t.co/VAtOv5bD41 #JantaCurfew #coronaupdatesindia — TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2020 महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण? कोरोनाचे कुठे किती रुग्ण? मुंबई – 39 पुणे – 16 पिंपरी चिंचवड – 12 नागपूर – 4 यवतमाळ – 4 कल्याण – 4 नवी मुंबई – 3 अहमदनगर – 2 पनवेल – 1 ठाणे -1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 उल्हासनगर – 1 एकूण 89 महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले? पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबईत (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई महिला (1) – 19 मार्च उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च एकूण – 89 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू? कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च एकूण – 6 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू (Maharashtra Corona Patients Number

Corona community transmission Threat arises as India in second stage | Corona समूह संसर्ग : कोरोना प्रसाराचा तिसरा टप...

¬ई : गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 89 वर पोहोचली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून आज दोन आठवडे झाले. पुण्यातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची पहिली घटना 9 मार्च रोजी समोर आली होती. भारत सध्या Covid-19 च्या दुसऱ्या टप्प्यात असला, तरी तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. या टप्प्यात समूह संसर्ग होण्याची भीती आहे. (Corona community transmission Threat) कोरोना प्रसाराचा तिसरा टप्पा नेमका काय? एखाद्या व्यक्तीला जेव्हा कोरोनाची लागण होते, मात्र संसर्गाचा स्त्रोत ओळखणे कठीण असते, संबंधित व्यक्तीचा कोणत्याही कोरोना संक्रमित देशात किंवा एकूणच परदेशात प्रवास झालेला नसतो. तसेच कोरोनाग्रस्त व्यक्तीशी तिचा थेट संपर्क आलेला नसतो, तेव्हा हा (तिसरा) टप्पा 'समूह संसर्ग' (community transmission) म्हणून ओळखला जातो. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने भारत अद्याप त्या टप्प्यावर अधिकृतपणे पोहोचला नसल्याचं सांगितलं आहे. 'आयसीएमआर'चे म्हणणे असूनही, कोरोनाची लागण झालेल्या काही अलिकडच्या घटना चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये उत्तर परगणा जिल्ह्यातील डमडम येथे राहणाऱ्या 57 वर्षांच्या रहिवाशाचा परदेशात प्रवासाचा इतिहास नाही. पुण्यात परदेशी प्रवास न केलेल्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क न आलेल्या 41 वर्षे महिलेला व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येऊन माहिती घेतली आहे. या महिलेच्या संपर्कातील सहापैकी चार जणांना बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. चार व्यक्तींमध्ये महिलेच्या मुलाचाही समावेश आहे. त्याचबरोबर तिची बहीण, बहिणीचा पती आणि मुलीला बाधा झाली आहे. या सर्वांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पाचही जणांची परदेश प्रवास किंवा संबंधित प्रवाशांच्या संपर्काची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मात्र ती महिला एका लग्नासाठी नवी मुंबईतील वाशी येथे गेली होती. तिथे तिचा एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीशी संपर्क आला असावा, असा संशय आहे. (Corona community transmission Threat) VIDEO : महाराष्ट्र लॉकडाऊन Day 2 LIVE: रेल्वे, लोकल बंद पण रस्त्यांवर तुरळक गर्दी pic.twitter.com/CsfvyuxLYM — TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2020

Philippines Corona Patient Dies in Mumbai during treatment | मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर

¬ई : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत  (Philippines Corona Patient Dies) असून मुख्यमंत्र्यांच्या भाषेत तो गुणाकार करताना दिसत आहे. कारण मुंबईत कोरोनाबाधिताचा तिसरा बळी गेला आहे. मूळचा फिलिपिन्सचा असलेल्या नागरिकाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाल्याने आता देशातील मृतांचा आकडा आता 7 वर येऊन पोहोचला (Philippines Corona Patient Dies) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही 68 वर्षीय फिलिपिन्सची नागरिक असल्याची माहिती आहे. A 68-year-old Philippines citizen, initially tested positive for #COVD19 but subsequently became negative, passed away yesterday. He was shifted from Kasturba hospital to a pvt hospital. He had developed acute renal failure&respiratory distress: Public Health Department, #Mumbai — ANI (@ANI) March 23, 2020 कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तीने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केल्याचं समोर आलं आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला. हेही वाचा : कोरोनाचा विळखा : 24 तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 वरुन 89 वर ही व्यक्ती एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपिन्सहून 10 जणांच्या गटासह मुंबईत आली होती. ते सर्वात अगोदर मुंबईत आले. त्यानंतर ते नवी मुंबईत गेले आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून दिल्लीला गेले. विशेष म्हणजे त्यानंतर ते दिल्लीतून पुन्हा मुंबईत आले आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेले. तिथे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना उपचारासाठी थेट कस्तुरबा रुग्णालयात हलवलं. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास 3 मार्च – फिलिपिन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांना गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली. 5 मार्च – फिलिपिन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला. 6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली 7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला 10 मार्च – रेल्वे मार्ग हा गट दिल्लीतून (Philippines Corona Patient Dies) मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला 10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 68 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले 12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं 13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या 14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं 17 मार्च – 68 वर्षीय बाधिताची प्रकृती खालावली असून, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं 24 तासात कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये 15 नव्या रुग्णांची वाढ त्यासोबतच कोरोनाच्या गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण? कोरोनाचे कुठे किती रुग्ण? मुंबई – 39 पुणे – 16 पिंपरी चिंचवड – 12 नागपूर – 4 यवतमाळ – 4 कल्याण – 4 नवी मुंबई – 3 अहमदनगर – 2 पनवेल – 1 ठाणे -1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 उल्हासनगर – 1 एकूण 89 महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले? पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबईत (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई महिला (1) – 19 मार्च उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च एकूण – 89 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू? कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई - 68 वर्षीय फिलिपिन्सची नागरिकाचा मृत्यू (1) - 23 मार्च एकूण – 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू Philippines Corona Patient Dies संबंधित बातम्या :  आई दवाखान्यात, महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात, जयंत पाटलांकडून राजेश टोपेंचं आगळंवेगळं कौतुक कोरोनाला रोखण्यासाठी देश सज्ज, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन पुण्यात ‘कोरोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला, परदेशी न जाताच महिलेला लागण, चार नातेवाईकही बाधिà¤